shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हॉटेल साईश ते गणेश गॅस एजन्सी पर्यंतचा रस्ता रुंदीकरण करावा


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

शिर्डीतील अतिशय वर्दळीचा असलेला पिंपळवाडी रोड  हॉटेल साईश चौक ते श्री साई गणेश गॅस एजेन्सी पर्यंतचा रस्ता अतिशय अरुंद असून सदर रस्त्याची गेल्या 3 वर्षांपूर्वी मोजणी होऊन नगरपरिषदने हद्द निश्चित करून निशाण सुद्धा केले आहे मात्र अजूनही हा रस्ता विकसित होण्यापासून वंचित का..? असा उद्विग्न सवाल विचारत नगरपरिषदेने लवकरात लवकर लक्ष देऊन या रस्त्याचे रुंदीकरण करावे अश्या मागणीचे निवेदन पिंपळवाडी रोड,दत्तनगर,गायके वस्ती,माऊली नगर,शिंदे शेळके वस्ती तसेच या भागातील इतर उपनगरांमधील नागरिकांनी  शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना दिले आहे.

माजी नगरसेवक अशोक गायके यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की या रस्त्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद शाळा,हॉस्पिटल,गॅस एजन्सी,पेट्रोल पंप तसेच इतर शाळा महाविद्यालये आहेत मोठ मोठी वाहने ट्रक या रस्त्याने वाहतूक करत असतात.तसेच तारांकित हॉटेल मुळे साई भक्त आणि शाळा महाविद्यालय यामुळे लहान मुले सायकल वर तसेच पायी ये जा करत असतात या रस्त्याने अनेक अपघात झाले असून मागे एका अपघातात एका मुलीला अपंगत्व सुद्धा  आले त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याच्या प्रश्र्नी मुख्याधिकारी यांनी लक्ष घालत हा रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणी केली आहे

यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र गोंदकर,नगरपंचायतचे माजी गटनेते अशोक गोंदकर,बाळासाहेब तुकाराम गोंदकर, बाळासाहेब शिवाजी गोंदकर,मा.नगरसेवक अशोक गायके,चेतन कोते,प्रसाद गायके,सचिन गोंदकर,संतोष दुसाने, मुकुंद गायके,आण्णासाहेब गायकवाड,मयूर दांगट,दत्तात्रय शिंदे,सतीश गोंदकर, शाम गायके यांसह मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
close