सामोडे प्रतिनिधी : ( दिलीप घरटे )
सामोडे परिसरातील शेतकरी गुंतले शेती कामात जून माहिना जवळ येताच शेतकरी शेती तयार करायला सुरुवात केली यात नांगरणी वखरणी शेणखत टाकणे घाण वेचणे गुंरासाठी चारा भरणे बांधावर माती टाकणे शेतातील दगड वेचणे आदि कामे करण्यास सुरुवात केली आहे एकी कडे कांदा ला भाव नाही मातीमोल भावाने विकला जात आहे खर्च सुद्धा निघत नाही शासन मात्र शेतकरी बांधवांसाठी काही च करत नाही.
रासायनीक खतांच्या किंमती मात्र वाढत आहेत यावर्षी शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे पेरणी साठी बियाणे खते घेण्यासाठी सावकारी कर्ज घेण्याची वेळ आली आहे शेतकरी बांधवांच्या कुठल्याही धान्य ला भाव नाही कांदा मुळे शेतकरी आधिक कर्ज बाजारी झाला आहे आता शेतकरी राजा ने जगावे कसे असा प्रश्न आता पडु लागला आहे शासनाने पेरणी साठी मोफत बियाणे खते उपलब्ध करून दिल्या स बरे होईल शेतकरी बांधवांसाठी अच्छे दिन येणार आहेत यांची वाट मात्र शेतकरी बघत आहे

