shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात वडार समाज संघाचे उपोषण

अहमदनगर प्रतिनिधी:
वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने अहमदनगर पाटबंधारे विभागातीलय मनमानी कारभाराविरोधात आज सोमवार दि.१ मे २०२३ पासून उपोषण करण्यात येत आहे.

अधीक्षक अभियंता नाशिक पाटबंधारे मंडळ.नाशिक यांच्या अधिपत्याखाली येणारे अहमदनगर पाटबंधारे विभाग, अहमदनगर येथील कार्यकारी अभियंता श्री.नान्नोर व त्यांच्या नियंत्रणाखाली येत असलेले देवळाली प्रवराचे उप अभियंता श्री.थोरे,अकोले पा.बं. उपविभागाचे श्री.जोर्वेकर,लोणी प्रवरा उजवा कालव्याचे उप अभियंता श्री.पावटेकर,मुळा शिर्षकर्मेचे उप अभियंता श्री. शिंदे, श्रीरामपूर येथील वडाळा पाट बंधारे उपविभागाचे श्री. कलापुरे,व इतर उपविभागीय अभियंता यांच्या अधिपत्याखाली काम करणारे सर्वच शाखाधिकारी यासर्वांनी आपसात संगनमत करून काही सबंधित ठेकेदारांना हाताशी धरुन आर्थिक हव्यासापोटी अंदाजपत्रकानुसार कामे न करता थातूर- मातूर अत्यंत निकृष्ठ दर्जाचे कामे करुन मोठ्या प्रमाणात बोगस बीले काढत शासनाच्या पैशांची लयलूट केली आहे ?, यामुळे शासनाची व जनतेची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्यात येवून  फसवणूक केली गेली आहे.

कारण संबधित विकासकामांबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली असता, माहिती न देता ती लपविली जात आहे, माहिती दिल्याने सत्यता बाहेर पडेल या उद्देशाने माहिती अधिकारात माहिती मागितल्यानंतर आजपर्यंत कोणालाही माहिती देण्यात आलेली नाही.अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते यांना माहिती न देता दबावतंत्र वापरून माहिती मिळाली असे लिहून घेतल्याचे कार्यालयात आढळून येते.अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मजूर सोसायट्यांनी कामासाठी मागणी पत्राने मागणी केलेली असताना देखील त्या मजूर सोसायट्यांना नियमाप्रमाणे कामे न देता ठराविकच आर्थिक मिलिभगत करणाऱ्या मजूर सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात कामे देण्यात आली असल्याचे 
या ठिकाणी सर्रास आढळून येते.वडार समाजाचा जलसंपदा व पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम या विभागाशी हे सर्व कामे करण्याचा पुर्वेइतिहास असताना वडार मजूर सोसायट्यांना वर्षानुवर्षे  कामे देण्यासाठी नेहमी टाळाटाळ केली जाते ही बाब प्रखर निंदनीय व निषेधार्य आहे.

वरील संबधित सर्व अभियंते व शाखाधिकारी यांची प्रामाणिक अधिकारी मार्फत  त्रिसदस्यीय कमेटी नेमून सदरील अभियंते यांची खातेनिहाय सखोल चौकशी करुन दोषी आढळल्यास त्यांचेवर  तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करुन त्वरित त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे, त्याचप्रमाणे वरील सर्व अभियंते व शाखाधिकारी यांच्या चल-अचल संपत्तीची लाॅकर्समध्ये असलेल्या संपत्तीची व मालमत्तेची गुन्हे अन्वेषण व अंमलबजावणी संचालनालय (E.D.) मार्फत तातडीने खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच्या दिवशी आज सोमवार दि.०१ मे २०२३ पासून लोकशाही मार्गाने सदर उपोषण करण्यात येत आहे.

या उपोषणासाठी रामचंद्र मंजूळे (प.महाराष्ट्र अध्यक्ष-या वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्य) रमेश जेठे (राष्ट्रीय सल्लागार ओल्ड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडीया,नवी दिल्ली), मोहनराव गायकवाड (अध्यक्ष-वडार समाज सेवा संघ,अहमदनगर), राजेंद्र पांढुरंग ननवरे (जिल्हा अध्यक्ष रासप), किरण बाळासाहेब तागडकर (नगर तालुकाअध्यक्ष- मी वडार महाराष्ट्र), मिनीनाथ माने (
जिल्हाध्यक्ष-शिव क्रांती वडार फौडेशन-अहमदनगर)  सागर धनवटे (अहमदनगर जिल्हा सचिव -वडार समाज संघ),.तुकाराम गुंजाळ ( मा.सरपंच व सामाजिक कार्यकर्ते),मोहनराव गायकवाड ,मनोज माने किरण तागडकर ,पोपट कुसमुडे,,ज्ञानेश्वर जंगम,संजय डुकरे (सामाजिक कार्यकर्ते), व वडार समाजाचे समाजिक कार्यकर्ते आदी उपोषणाला बसले आहेत.


वृतसंकलन - समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर
close