लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी येथे १ मे महाराष्ट्र दिन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: बोराटवाडी गावचे जेष्ठ नागरिक श्री.कृष्णा बळवंत बोराडे (पमा अण्णा) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोराटवाडी गावचे सरपंच दत्तू
सवासे,निरा-भिमाचे मा.संचालक अजिनाथ बोराडे पाटील,दूधगंगा चे संचालक दयानंद गायकवाड, राजू भाळे, प्रकाश खुसपे , मच्छिंद्र देवकर, तुकाराम इंगवले, लालासो हेगडकर, तुकाराम बर्गे, पोपट सुद्रीक, विनोद सावंत इ. ग्रामस्थ व तरूण वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य भीमराव आवारे सर* यांनी केले.विद्यालयाची *माजी विद्यार्थिनी कु.काजल पांडुरंग शिंदे* हिची पुणे ग्रामीण पोलिस दलात नियुक्ती झाल्याबद्दल तिचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
कु.काजल शिंदे हिने मनोगत व्यक्त केले. परिस्थिती पेक्षा परिश्रमाने यश्रस्वी होता येते.त्यासाठी जिद्द बाळगून परिश्रम घेतले पाहिजे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष .कृष्णा बोराडे* यांनी आपले विचार व्यक्त केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल पत्रक वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन .अमर निलाखे सर* यांनी केले.

