shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पडस्थळ येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.

पडस्थळ येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.

महास्वच्छता श्रमदान अभियान अंतर्गत केली ग्रामस्थांनी स्वच्छता.
इंदापूर प्रतिनिधी: पडस्थळ येथे महाराष्ट्र स्थापना दिवस व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त सोसायटीचे माजी चेअरमन सुग्रीव बोंगाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून स्वच्छतेबद्दल संदेश दिला. 
या स्वच्छता मोहिमेत सरपंच वैशाली मारकड, उपसरपंच सपना बोंगाणे, ग्रामपंचायत सदस्या विद्या बोंगाणे तसेच पांडुरंग मारकड, सुग्रीव बोंगाणे, महेंद्र रेडके, अमोल कोळेकर, राजेंद्र बोंगाणे, गणेश गव्हाणे, चंद्रकांत बोंगाणे,अनंता राऊत, गोकुळ कोळेकर, ग्रामसेवक महेश यादव, खंडेराव कोकरे तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
यावेळी ग्रामपंचायत ऑफिस परिसरातील स्वच्छता करण्यात आली. शाळेतील मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 
ग्रामसेवक महेश यादव यांनी शासनाने निर्धारित केलेल्या महास्वच्छता श्रमदान अभियान व आयुष्यमान भारत अभियान या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.
close