आ. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत इंदापूर पंचायत समिती सभागृह येथे खरीप हंगाम नियोजन आढावा सभा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: आज दि. ०१ मे २०२३ रोजी खरीप हंगाम नियोजन आढावा सभा पंचायत समिती, सभागृह इंदापूर येथे पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे हे होते. खरीप हंगाम २०२३ च्या अनुषंगाने पंचायत समिती कृषी अधिकारी, राजेंद्र काळे यांनी प्रस्ताविक केले व तालुका कृषी अधिकारी भाऊ साहेबराव रुपनवर यांनी कृषी विभागाच्या सन २०२२-२३ मधील विविध योजने अंतर्गत शेतकरी यांना दिलेल्या योजनाचा लाभाचे आढावा सादर केला तसेच तालुक्यात रासायनिक खत, बियाणे व किटकनाशके योग्य तो साठा असल्याचे काळे यांनी सांगितले तसेच जिल्हा परिषद कडील कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी व कृषी विभागाकडील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकरी यांना सन्मानपत्र,शाल, श्रीफळ आमदार महोदय च्या हस्ते देण्यात आले. तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना मार्गदर्शन केले. या वेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पशुधन विकास अधिकारी डॉ. राम शिंदे, मंडळ कृषी अधिकारी भिगवण बाळासाहेब कोकणे, बावडा गणेश सूर्यवंशी, इंदापूर संजय कदम, सणसर श विक्रम वाघमोडे, कृषी अधिकारी सतिश महारनवर व कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते. विस्तार अधिकारी . शेख यांनी सूत्रसंचालन केले व आभार मंडळ कृषी अधिकारी, बावडा. गणेश सूर्यवंशी यांनी मांडले

