नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पण माजी मंत्री दत्तात्रेय भरणे व माजी नगराध्यक्ष अंकिताताई शहा यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: आज दिनांक 1 मे 2023 रोजी हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे झाले.
इंदापूर शहरातील सोनाईनगर येथे नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पण माजी मंत्री दत्तात्रेय भरणे व माजी नगराध्यक्ष अंकिताताई शहा यांच्या हस्ते झाले.
नागरी आरोग्य केंद्रामध्ये लोकांना प्रामाणिकपणाने सेवा देऊन लोकांचं आरोग्य सुधारण्यावर भर द्यावा याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी केले.
नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याचे उद्देश, दवाखान्यांमध्ये उपलब्ध बाह्य रुग्ण सेवा , मोफत औषधोपचार, मोफत तपासणी ,टेलीकन्सल्टेशन गरजेनुसार तज्ञ मार्फत सात प्रकारच्या सेवाबाबत माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमास गटविकास अधिकारी विजयकुमार परीट , सहाय्यक गट विकास अधिकारी शिंदे, माजी नगरसेवक पोपट शिंदे ,तालुका आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप जगताप , आरोग्य सहाय्यक दीपक उत्तेकर , आरोग्य सहाय्यक गणेश मोरे लेखापाल सुरेश शिर्के उपस्थित होते.

