,गौराईमळा शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ विविध स्पर्धांनी साजरा
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ६ मे २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा येथे राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात आला.प्रथम मुख्याध्यापक श्री .प्रताप शिरसट सरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.नंतर श्रीम. जुबेदा पठाण मॅडम यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली.विद्यार्थ्यांची भाषणे झाली.नंतर या शैक्षणिक वर्षाच्या निकालपत्रकांचे शाळेतील सर्व मुलांना वाटप करण्यात आले.निकाल पाहून सर्व मुले आनंदीत झाली या वेळी रांगोळी चित्रकला व पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या तसेच इंदापुर तालुका प्रज्ञाशोध परीक्षेतील मुलांचे स्वागत करुन अभिनंदन करण्यात आले इयत्ता ३ री व इयत्ता ४ थी दोन्ही वर्गाचे निकाल १००%लागला आहे तसेच तालुका व केंद्र गुणवत्ता यादीत आपल्या शाळेतील मुलांची चमकदार कामगिरी केली म्हणुन विदयार्थी व वर्ग शिक्षिका श्रीम.पठाण मॅडम यांचे पण अभिनंदन करण्यात आले .या कार्यक्रमाला शाळा व्य समितीचे अध्यक्ष विलास शिंगाडे ,सदस्या प्रियांका जाधव अंगणवाडी मदतनीस कल्पना जाधव पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.आभार उपक्रमशील शिक्षिका श्रीम.जुबेदा पठाण यांनी मानले.

