* रमेश जेठे,संजय देवकर,राजेंद्र ननवरे ,किरण तागडकर यांचे प्रामाणिक सामाजिक योगदान..
* मा. राज्यमंत्री विजयरावजी चौगुले यांचे डाॅक्टरांना फोन..
अहमदनगर :- केज येथील रुग्ण संतोष अर्जून लष्करे वय ३० यांचे तारकपूर (अहमदनगर) येथील एका हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवार दि.५मे २०२३ ला दुपारी १२वाजता निधन झाले. त्यांचेबरोबर मयताची बहिण सविता साहेबराव पवार ह्या महिला होत्या. केज आणि अहमदनगर येथील अंतर मोठे आफारहे..त्यात त्यांचेजवळ पैसेही नव्हते..सर्व बाजूने त्यांना संकटांनी घेरलेले होते.त्यांना अशात काहिच सुचत नव्हते..त्यांनी बीड येथील आपले नातेवाईक वडार समाज संघाचे सरचिटणीस संजय देवकर यांना माहिती दिली..त्यांनी अहमदनगर येथील वडार समाज संघाचे प्रदेश सचिव व पुर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिध्द असलेले रमेश जेठे (सर) यांना कळवले ते जुन्नरला(पुणे) येथे गेले होते. तरी त्यांनी जोरदारपणे यंत्रणा हलविली..
सदर डाॅक्टर यांची फी १३८००० रु.बाकी राहिली होती.ही रक्कम सदर डाॅक्टरांना सुट देण्यासाठी विनंती केली, संबंधितांची मजबुरी व्यथित केली, त्याना शव नेण्यासाठी देखील पैसे नाही..त्यांना उलट याच कार्यकर्ते यांनी केज येथे शव नेण्यासाठी वर्गणी करून मदत केली आहे. असे वस्तूस्थिती दर्शविल्यानंतर सदर डाॅक्टरांनी मोठा दिलदारपणा दाखवून पुर्ण रकमेची सुट देऊन सामाजिक बांधिलकी दाखवत सदर मृतदेह केज येथील नातेवाईकांचे ताब्यात दिले.
यावेळी रासपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ननवरे व मी वडार महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष किरण तागडकर यांनी रमेश जेठे (सर) यांना मोलाची मदत केली.सदर हाॅस्पिटला जाऊन नातेवाईकांची भेट घेऊन सदर व्यक्तिचे मृतदेह नातेवाईकांना ताब्यात दिले...
आज माणुसकी हरवत चालली आहे..दुसर्यांच्या मदतीला कोणी जायाला तयार नाहीत..यात काय माझा फायदा होईल का ? ही विचारसरणी वाढत चालली आहे..अशा वेळी ओळख नसतानाही केवळ सामाजिक बांधिलकी ठेऊन सहकार्य करणे ही घटना विरळाच..
याप्रमाणे या सामाजिक कार्यकर्त्यांनी वैशिष्ट्यपुर्ण सामाजिक योगदान दिल्यामुळे या सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे.

