shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वांबोरी - तरूणीला मिठी मारून तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन, गून्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक ०४ मे २०२३

राहुरी (वांबोरी) : बाथरूम मधून अंघोळ करून बाहेर आलेल्या २५ वर्षीय तरूणीला मिठी मारून तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात दोघा जणांवर विनयभंग चा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
या घटनेतील २५ वर्षीय तरूणी ही दिनांक २ मे रोजी पहाटे ६.३० वाजेच्या सुमारास बाथरूम मधून अंघोळ करून बाहेर आली. तेव्हा आरोपीने पाठीमागून जाऊन त्या तरूणीला मिठी मारली व दोन्ही हाताने छाती दाबून तीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच अनाधिकृत पणे त्या तरूणीच्या घरात प्रवेश केला. आणि तीला काठीने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली.

घटनेनंतर पिडीत तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला. तीच्या फिर्यादीवरून आरोपी अजित योहान मकासरे, वंदना योहान मकासरे व कविता शैलेंद्र पटेकर, सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ४५१/२०२३ भादंवि कलम ३५४, ३२४, ४५२, ५०४, ५०६ प्रमाणे विनयभंग, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वाल्मिक पारधी हे करीत आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close