shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी - धुम स्टाईलने चोरी गेलेले सोन्याचे दागीने सहा महिन्या नंतर परत मिळाले..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक ०४ मे २०२३

अपेक्षा नसताना चोरीस गेलेले दागीने परत मिळाल्याने पोलिस प्रशासनवरील विश्वास वाढला- सौ. विणा मंचरे..!!

राहुरी : नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने धूम स्टाईलने चोऱ्या करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना सहा महिन्यांपूर्वी ताब्यात घेतले. त्यांनी पोलीस कोठडीत राहुरी फॅक्टरी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडल्याची कबुली दिली. पोलिसांनी दागिने हस्तगत केले. राहुरी पोलीस ठाण्यात पीडितेला चोरी गेलेले दागिने परत मिळाल्याने सुखद धक्का मिळाला. 

विणा राजेश मंचरे, वय ४४ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी. असे दागिने परत मिळालेल्या पीडितेचे नाव आहे. त्यांना न्यायालया मार्फत एक तोळ्याची सोन्याची साखळी व दीड तोळ्याचे गंठण असा मुद्देमाल पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या हस्ते परत मिळाला. 
राहुरी फॅक्टरी येथे १४ जून २०२२ रोजी सायंकाळी ३.४५ वाजता श्री विवेकानंद नर्सिंग होमच्या प्रवेशद्वारा जवळ नगर-मनमाड रस्त्यावर पायी चालत असताना विणा मंचरे यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने ओरबाडून शिर्डीच्या दिशेने धूम ठोकली. मंचरे यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे दिसेनासे झाले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरुद्ध फिर्याद दिली होती. 

दरम्यान नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन चोरट्यांची टोळी पकडली. त्यात एका चोरट्याने राहुरी फॅक्टरी येथील धूम स्टाईलने चोरीची कबुली दिली. नगर पोलिसांनी फिर्यादी वीणा मंचरे यांना संपर्क साधून दागिन्यांची खात्री केली. चोरट्यांच्या ताब्यातून दागिने हस्तगत केले. राहुरी न्यायालयाच्या आदेशाने पीडिता विणा मंचरे यांना त्यांचे दागिने परत मिळाले.

गळ्यातील सोन्याची साखळी व गंठण असे अडीच तोळ्यांचे दागिने ओरबाडून धूम स्टाईलने चोरी झाली. त्यावेळी मोठी निराशा निर्माण झाली होती. तरी दागिने मिळण्याची खात्री नव्हती. परंतु सर्व दागिने परत मिळाले. त्यामुळे पोलीस खात्यावरचा विश्वास बळावला आहे. असे मनोगत वीणा मंचरे यांनी व्यक्त करून पोलिस प्रशासनाचे आभार मानले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close