shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणारा अहमदनगरमधून ताब्यात..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक ०४ मे २०२३


गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणारा अहमदनगरमधून ताब्यात..!!

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून आपल्या नृत्यामुळे प्रसिद्ध झालेली नृत्यांगना गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने त्या मुलाला आई-वडिलांसह विमान नगर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. महिला आयोगाने देखील याप्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुढे पोलिसांनी तपास सुरू करत या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.


हा व्हिडीओ काही विकृत मंडळींनी सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे याची राज्यभर चर्चा झाली. ही मंडळी इथेच थांबली नाही तर गौतमीच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडीओ देखील व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे गौतमीसोबत नृत्य करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान, आपल्या नृत्याच्या अदाकारीने गौतमीला प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्यासोबतच तिच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी किंवा तिने नृत्य करताना केलेल्या हावभाव यामुळे ती याआधी देखील चर्चेत आली होती. मात्र, त्यावेळी तिने माफी मागून या वादावर पडदा टाकला होता. हा वाद शमला असतानाच गौतमीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे गौतमीची चर्चा राज्यभर झाली.

या प्रकरणी तिने सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्याबाबत पोलीस चौकशी करत असून एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.


Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close