shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मारुती भुई यांचा आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन .पुणे ग्रामीण पोलीस पदी निवड झाल्याबद्दल केला सत्कार.

मारुती  भुई यांचा आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन .

पुणे ग्रामीण पोलीस पदी निवड झाल्याबद्दल केला सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील कालठण गावचे सुपुत्र मारुती मोहन भुई यांची पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे,  हनुमंत पाटील, राहुल भुई इत्यादी उपस्थित होते.

मारुती  भुई  यांचे वडील मोहन भुई हे मासेमारी करीत असून त्यांनी मारुती भुई यास कालठण नंबर १ येथे  प्राथमिक , माध्यमिक   शिक्षण दिले त्यानंतर त्यास नारायणदास रामदास हायस्कूल येथे अकरावी बारावी सायन्स मध्ये शिक्षण दिले. त्यानंतर २००४ साली मारुती भूई मिल्ट्री मध्ये भरती झाले. त्यांनी २०२० पर्यंत सतरा वर्ष देश सेवा केली. निवृत्तीनंतर  २०२१ च्या पोलीस भरती मध्ये सहभाग नोंदवत त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस मध्ये त्यांची निवड झाली त्याबद्दल इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे ग्रामीण पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल भरणेवाडी येथे त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भटक्या विमुक्त जाती जमाती सेल पुणे जिल्हाध्यक्ष  अण्णासाहेब धोत्रे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
close