पुणे जिल्ह्यातील सहकार सेना शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झाल्या निवडी.
सहकार सेना शिंदे गट शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्राचे सचिव सुरज काळे यांनी निवडीसाठी घेतले परिश्रम.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावचे सुपुत्र सुरज वसंत काळे यांची शिंदे गटातील शिवसेनेच्या शिव सहकार सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्याला दिलेल्या पदाचा व जबाबदारीचा विचार करून शिंदे गट शिवसेना सहकार सेनेचे पदाधिकाऱ्यांचे जाळे निर्माण करून शिंदे गट शिवसेना बळकट करण्याचा प्रयत्न माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा शिवसहकार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या हस्ते सहकार सेना शिवसेनेच्या पुणे जिल्हा कार्यकारणीची निवडी करून नुकतेच नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ॲड. अनंत सकुंडे कार्याध्यक्ष सहकार सेना महाराष्ट्र राज्य , आनंद यादव उपाध्यक्ष सहकार सेना महाराष्ट्र राज्य, शिवाजी पाटील सहकार सेना- सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, नागेश वनकळसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,सुरज काळे विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र, यांच्या उपस्थितीत सहकार सेनेच्या पुणे जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या मुंबई येथील शालिनी पॅलेस दादर या ठिकाणी देण्यात आल्या.
यामध्ये सहकार सेना शिवसेना जिल्हाप्रमुख पुणे
विजयराव राजाराम ताकवणे यांची नियुक्ती झाली व ॲड.आसावरी प्रभुणे यांची पुणे शहर प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली तर पुणे जिल्हा सचिव
सुरेश यादव यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
तसेच स्वप्निल धुमाळ शिरूर तालुका प्रमुख , विकास साळुंखे हवेली तालुकाप्रमुख, शल्लुराज पिल्ले दौंड तालुकाप्रमुख ,नितीन गायकवाड बारामती तालुकाप्रमुख, अनिल कदम इंदापूर तालुका प्रमुख, मनोज काळंगे सचिव इंदापूर तालुका, राजेंद्र चौधरी सचिव शिरूर तालुका ,आशिष शेळके सचिव हवेली तालुका, भूषण शिंदे सचिव दौंड तालुका, संपत बनकर सचिव बारामती तालुका, श्रीराम बंड दौंड उपशहर प्रमुख, अभिमन्यू टकले उपाध्यक्ष भिगवण -शेटफळगडे जिल्हा परिषद गट ,अजिंक्य रणमोडे कळस- वालचंदनगर जिल्हा परिषद गट, अशोक चव्हाण पळसदेव -बिजवडी जिल्हा परिषद गट, रामदास काळे लासुर्णे- सणसर जिल्हा परिषद गट , संतोष जाधव उपाध्यक्ष निमगांव केतकी- निमसाखर जिल्हा परिषद गट यांना वरील मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

