प्रविण कोकाटे अँण्ड असोसिएटस् चा अनोखा उपकम
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ८ / बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार व कामगार यांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी प्रविण कोकाटे अँण्ड असोसिएटस् यांच्या वतीने दि . ६ मे रोजी चिचोंडी पाटील परिसरात कॅपचे वाटप करण्यात आले.
कृषी क्षेत्रानंतर सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या बांधकाम क्षेत्रामध्ये ऊन,वारा,पाऊस यापैकी कशाचाही विचार न करता या क्षेत्रातील ठेकेदार व कामगार यांना काम करावे लागते.उन्हाळ्यातील परिस्थितीचा विचार करता पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांनी बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार व कामगार यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी कॅपच्या स्वरूपात छोटीशी भेट दिली.या उपक्रमाचे बांधकाम क्षेत्रातून स्वागत होत आहे.

