प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
गुंडेगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील ग्रामदैवत तथा सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान म्हणून नावलौकिक असलेले श्री भैरवनाथ यात्रोत्सवाचा कार्यक्रम शुक्रवार दि.६ व ७ मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नगर तालुक्यातील गुंडेगाव हिंदू संस्कृती व एकोपा जोपासणारे गाव म्हणून नावलौकिक आहे.याठिकाणचा यात्रोत्सव सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो. श्रीशुढळा नदी तीरावर ग्रामदैवत तथा भाविकांचे श्रद्धास्थान भैरवनाथ देवस्थान आहे.दरवर्षी सर्वधर्मिय ग्रामस्थ एकत्रितपणे खेळीमेळीच्या वातावरणात हा उत्सव साजरा करत असतात.व्यवसाय,नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आवर्जून गावात हजेरी लावत असतात.बुध्द पौर्णिमेपासून यात्रेला सुरूवात होते.पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पैठण येथून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने भैरवनाथाला अभिषेक करुन भव्य मिरवणूक काढण्यात येते.नंतर यात्रोत्सवास सूरूवात होत असते.या मिरवणूकीत सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन भैरवनाथाची मिरवणूक काढतात.भैरवनाथ चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ, गुळाच्या शेरणीचा प्रसाद दाखवून भाविक-भक्त आपली इच्छापुर्ती करतात.त्याच दिवशी संध्याकाळच्या दरम्यान देवाचा छबीना निघातो शोभेच्या रंगीत फटाक्यांची आतिषबाजी लक्षवेधी असते.हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी महिला,पूरूष, बालगोपाळ देखील सहभागी होत असतात.दुसऱ्या दिवशी वेशीच्या आतमध्ये थाटलेल्या विविध दुकानांत यात्रेत आलेली मनोरंजनाची साधने यात्रेकरूंचे लक्षवेधुन घेत होती.
सायंकाळी यात्रा उत्सवा निमित्त कुस्तीचा आखाडा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी गुंडेगावचे उपसरपंच संतोष भापकर,खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बबनराव हराळ,पै.बाळासाहेब भापकर यांच्या हस्ते आखाड्याचे पुजन करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच नानासाहेब हराळ, सुनील भापकर, माजी सरपंच संजय कोतकर, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब हराळ, रामदास हराळ, सतिश चौधरी, भाऊसाहेब हराळ, संतोष धावडे, राहुल चौधरी, गणेश हराळ, संतोष सकट, त्रिदल संघटनेचे श्यामराव कासार, संदीप कोतकर, झुंबर भापकर, प्रदीप भापकर, सचिन जाधव,सागर कासार,पै.गोरख कोतकर, दादाभाऊ हराळ,बापुराव चौधरी, दादासाहेब आगळे, संजय भापकर,उपस्थित होते. या स्पर्धेसाठी ५० हून अधिक पैलवान स्पर्धकांनी अहमदनगर जिल्ह्यातील गावांमधून उपस्थिती नोंदविली होती.अतिशय अटीतटीच्या सामन्यात विजेते आणि उपविजेतेपद घोषित करत त्यांचा यथोचित पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.अनेक कुस्त्या चुरशीच्या पाहायला मिळाल्या या आखाडयाचे समालोचक म्हणून उपसरपंच संतोष भापकर यांनी केले तर पंच म्हणून पैलवान बाळासाहेब केरु भापकर,बापु चौधरी, रामदास हराळ,दादाभाऊ हराळ, गोरख कोतकर,यांनी काम पाहिले.
यात्रेनिमित्त मनोरंजनासाठी महाराष्ट्रातील नामांकीत आनंद लोकनाट्य तमाशा जळगावकर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बबनराव हराळ पाटील व सुभाष कोतकर यांच्या हस्ते नारळ फोडून तमाशाला सुरुवात झाली.हा कार्यक्रम खेळी-मेळीच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला . यावेळी गुंडेगाव आणि पंचक्रोशीतील रसिक बांधवांनी लोकनाट्य तमाशा या कार्यक्रमाला मनसोक्त दाद दिली व आनंद घेतला गावची यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी नगर तालुका पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक श्री देशमुख साहेब, सहाय्यक पोलीस निरिक्षक थोरात साहेब,माने साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला.यात्रा कमिटी चे श्री.बबनराव हराळ पाटील, उपसरपंच संतोषजी भापकर, सतिश चौधरी,नानासाहेब हराळ, गणेश हराळ दुकानदार, शिवनाथ कोतकर, रावसाहेब हराळ, शैलेंद्र जावळे, सचिन जाधव व सर्वग्रामस्थ व तरुणांचे विशेष सहकार्य मिळाले त्याबद्दल उपसरपंच संतोष भापकर यांनी सर्वांचे आभार मानले..
"गावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा ही दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते याही वर्षी आम्ही यात्रा उत्साहात व धार्मिक पारंपरिक पद्धतीने साजरी केली आहे.दरवर्षी यात्रा लोकवर्गणीतून होत असते यासाठी गावातील नागरिकांनी सहकार्य केले जेणेकरून यात्रा उत्साहात व शांततेत पार पडली मी यानिमित्ताने गावकऱ्यांचे आभार मानतो व भविष्यातही अशाच प्रकारे यात्रा होतील असा विश्वास व्यक्त करतो.."
श्री. संतोष भापकर, उपसरपंच गुंडेगाव.

