कुमार प्रेम पिंटू वाकडे यांचा सत्कार व कौतुक
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ९ / सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रेम वाकडे याचा सत्कार नलिनी सुंदर पाटोळे फाउंडेशन च्या वतीने सौ. नलिनी व सुंदरराव यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. या शुभ प्रसंगी फाउंडेशन च्या सचिव सौ. सविता पाटोळे व ख्रिस्ती सेविका सौ. डोंगरे सिस्टर उपस्थित होत्या.
गुणवंत गरीब व मागासवर्गीय विद्यार्थी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन या हेतूने स्थापित झालेली ही संस्था आहे.
या संस्थेच्या माध्यामातून असे उपक्रम निःस्वार्थ पणे राबवावी असे या सत्कार समारंभ प्रासंगि सौ. नलिनी पाटोळे यांनी जाहीर केले. डॉन बोस्को पतसंस्थेचे संचालक श्री. सुंदरराव पाटोळे यांनी खेळाडूंना व गुणवंत विद्यार्थी यांना संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करू आशी गवाही दिली. या वेळी सिस्टर डोंगरे यांनी देवाचे आभार मानून प्रेम व संस्थेसाठी प्रार्थना केली.
सचिव सौ. सविता पाटोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि प्रेम व अश्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान तसेच कौतुक करण्यासाठी पुढाकार घेवून सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले .

