shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निधी आपके निकट कार्यक्रमाचे २९ मे रोजी संगमनेर येथे आयोजन

अहमदनगर (जिमाका वृत्तसेवा) :
 कर्मचारी भविष्य निधि संघटन (ई.पी.एफ.ओ.) अहमदनगरकडून सदस्य, निवृत्तीवेतन धारक आणि कंपनी मालकासाठी प्रत्येक महिन्यात 'निधि आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम २९ मे २०२३ रोजी आयोजित केलेला आहे. सहभागांच्या सोयीसाठी शिवशक्ती इमारत मालपाणी इंडस्ट्रियल पार्कच्या समोर, अकोले रोड, संगमनेर, येथे संपर्क साधावा.
ज्या सदस्यांच्या भविष्य निधि बाबत काही अडचणी असतील त्यांनी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत. असे सहायक भविष्य निधि आयुक्त जिल्हा कार्यालय अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

close