shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रिसोडच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाला पावसाळ्यात जाग येणार का?


शिर्डी एक्सप्रेस May 19, 2023

वासिम :- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद बस स्थानक ते प्रकाश वाघ यांचे घरापर्यंत येवती फाटा दरम्यान वाशिम ते रिसोड राज्य मार्ग असून या रस्त्याला नाल्या नसल्याने पूर्वेकडील शेताचे सर्व पाणी वाशिम - रिसोड रस्ता ओलांडून पश्चिमेला येते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळ्याचे पाणी जात असल्याने शेतीचे दरवर्षी नुकसान होत आहे. याबाबतचे निवेदन संबंधित शेतकऱ्याने दिले असून त्याची दखल अद्याप घेतली नसल्याने व पावसाळा तोंडावर आल्याने परत शेतीचे नुकसान होत आहे. दरवर्षी या पावसामुळे आर्थिक नुकसान होत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड हे कार्यालय दखल घेताना दिसत नाही.


त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी गतवर्षी दिलेल्या आश्वासनाची आठवण येण्यासाठी या बातमीची दखल घ्यावीच लागेल, करिता शेतकरी नरेश रामराव सरनाईक भुजंगराव दतराव सरनाईक, वसंता नामदेव आरू, कैलास विठोबा आरू, ज्ञानबा महादु आरु, आत्माराम नामदेव आरु, संतोष शिवाजी आरू, भगवान खंडूजी बोरकर इत्यादी शेतकऱ्याच्या मागणीचा सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांनी तात्काळ दखल घेऊन पावसाळ्याचे पाणी पडण्यापूर्वी नालीचे खोदकाम करावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
close