shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खोकर सोसायटीच्या अध्यक्षपदी मुरकूटे गटाचे अशोकराव कोल्हे यांची बिनविरोध निवड


*कारभार आणखी गतीमान करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशिल - ज्ञानेश्वर काळे

चंद्रकांत झुरंगे - भोकर
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्षपदी माजी आमदार भानुदास मुरकूटे गटाचे अशोकराव पुंजाजी कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अशोक कारखाण्याचे अध्यक्ष व माजी आमदार भानुदास मुरकूटे यांचे मार्गदर्शनाखाली व अशोक कारखाण्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या पुर्व भागात प्रगती पथावर असलेल्या खोकर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी अशोकराव पुंजाजी कोल्हे यांचे नावाची सुचना मावळते अध्यक्ष प्रकाश पवार यांनी मांडली त्यास नंदकुमार सलालकर यांनी अनुमोदन दिले.
सोसायटी सभागृहात श्रीरामपूरचे सहाय्यक निबंधक संदिपकुमार रूद्राक्ष यांचे अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या संचालक मंडळ बैठकीत हि निवड करण्यात आली. यावेळी सोसायटीचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर काळे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे नवनिर्वाचीत संचालक राजू चक्रनारायण, सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब सिन्नरकर, उपसरपंच दिपक काळे, पोलीस पाटील डॉ.अनिकेत चव्हाण, रावसाहेब चक्रनरारायण, प्रा.लक्ष्मण कोल्हे, तुकाराम सलालकर, गजानन पटारे, रविंद्र पटारे, ज्ञानदेव पवार आदि प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संदिपकुमार रूद्राक्ष यांनी काम पाहीले त्यांना सचीव कृष्णा शिंदे यांनी सहकार्य केले. यावेळी अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे व कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक राजू चक्रनारायण यांची मार्गदर्शनपर भाषणं झाली. या बैठकीस पोपटराव जाधव, भाऊसाहेब सिन्नरकर, बाबासाहेब पटारे, केशव चव्हाण, संजय काळे, नंदकुमार सलालकर, कादर सय्यद, मथुराबाई चक्रनारायण, सुशिला गव्हाणे, प्रयागाबाई भणगे, बाबासाहेब कचरे व शंकरराव शेरकर आदि संचालक उपस्थीत होते.
आमचे मार्गदर्शक अशोक कारखाण्याचे अध्यक्ष व माजी आमदार भानुदास मुरकूटे यांचे मार्गदर्शनाखाली खोकर सोसायटीत संत्तांतरानंतर अतिशय पारदर्शक व चांगला कारभार सुरू आहे. हा कारभार आणखी गतीमान करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशिल असल्याचे अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे यांनी सांगीतले. या अगोदरचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी चांगला कारभार केला त्याप्रमाणे युपढेही समाजाभिमुख कारभार करणार असल्याचे नवनिर्वाचत अध्यक्ष पुंजाजी कोल्हे यांनी सांगीतले. तर माजी आमदार भानुदास मुरकूटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची युती घट्ट व अभेद्य आहे ती तशीच राहील, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय देत गावच्या विकासात भर टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक राजू चक्रनारायण यांनी सांगीतले. 
यावेळी वसंतराव शेरकर, गणेश काळे, जालींदर पटारे, हुसेन सय्यद, कैलास सिन्नरकर, पिनू चक्रनारायण, शाम भणगे, शामराव पवार, भाऊसाहेब पटारे, प्रमोद शेरकर, मंज्जाबापू काळे, नानासाहेब काळे, राजू सलालकर, सुभाष कचरे, रमेश पवार, अशोक काळे, हरी पाटील, सागर शेरकर, गणेश पवार, सुभाष कचरे, अशोकराव चौधरी, ताजखाँ पठाण, दत्तात्रय काळे, रामचंद्र वार, जालींधर घुणे, सुरेश काळे, ज्ञानदेव काळे, रमेश घुणे, अनिल काळे, सचीव भाऊसाहेब चव्हाण, मन्सुर पठाण, भाऊसाहेब भणगे आदिंसह ग्रामस्थ व सोसायटीचे सभासद उपस्थीत होते.


यावेळी संपन्न झालेल्या सत्कार समारंभात नुकत्याच संपन्न झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक राजू चक्रनारायण व नवनिर्वाचीत अध्यक्ष अशोकराव कोल्हे यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदु सलालकर यांनी केले तर शेवटी प्रकाश पवार यांनी आभार मानले.
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*
close