सामोडे - (दिलीप घरटे प्रतिनिधी )
येथील वि.जा.भ.ज.आश्रमशाळेत १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.कामगार दिनाचे औचित्य साधून येथील आश्रमशाळा वसतिगृह अधिक्षक राजेंद्र निंबा साळवे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक आप्पासाहेब व्हि.एन.जिरेपाटील, संचालक विजयराव सोनवणे, संचालक विठ्ठलराव पगारे, मुख्याध्यापक शांताराम मोरे, अनुदानित आश्रमशाळा सामोडे चे मुख्याध्यापक पी.व्हि.जगताप, प्राचार्य झेड.एम.गवळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आशा चंद्रकांत पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, चतुर्थ कर्मचारी प्रयत्नशील होते.

