shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत अज्ञात वाहनाने पाठलाग करुन व्यवसायिक पती व पत्नी यांच्या बाईकला जोरदार धक्का देऊन गंभीर जखमी करून फरार

अहमदनगर प्रतिनिधी :    
शिर्डी येथील साईमंदिर परिसरातील साईश्लोक टि अँन्ड जनरल स्टोअर्स या नावाने व्यवसाय करणाऱ्या सौ. प्रेरणा वैद्य या बुधवार दिनांक २६/४/२३ रोजी रात्री ११:३० उशिरापर्यंत दुकान बंद करून पती सोबत पिंपळवाडी रोडने साईनिवारा येथील घरी जात असताना साईश चौकातुन ऐक‍ अज्ञात स्विफ्ट कार, पिवळी नंबर प्लेट असलेली पाठलाग करत येऊन साईनिवारा गेट मध्ये प्रवेश करुन त्यांच्या मोटरसायकलला जोरदार देऊन या धडकेत प्रेरणा वैद्य यांना गंभीर जखमी करून या वाहनचालकाने गाडी परत फिरवून आणून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले व प्रदिप वैद्य यांनी विरोध केला.
झटापटीत गाडीच्या ड्रायव्हरने वरील खिशातील रोख रक्कम घेऊन पळकाढत परत गाडी शिर्डी कडे वळाली प्रदीप वैद्य व त्यांच्या पत्नी जखमी अवस्थेत रस्त्यातच पडलेल्या होत्या त्यांनी मित्राला फोन करून गाडी बोलवली व त्यांच्या सहकाऱ्यांने रात्री एक वाजता साईनाथ हॉस्पिटल शिर्डी येथे ऍडमिट करण्यात आले या घटनेची संपूर्ण नोंद पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा क्रमांक भारतीय दंड संहिता १८६०/२७९, ३३६, ३३७, ३७९, मोटर वाहन अधिनियम १९५४‌ A १३४, B१३४ नोंद करण्यात आली.  शिर्डी पोलीस तपास करीत आहे या गुन्ह्याचा तपास करुन गुन्हेगारांना कडक शिक्षा करावी असे सामान्य नागरिक व व्यापारी यांनी मागणी करण्यात आली आहे.
close