shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले अभिवादन.

लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले अभिवादन.
इंदापूर प्रतिनिधी: जातिभेद निर्मूलन,अस्पृश्यता निवारण,स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा आधार,शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती,शेतीचा विकास इ. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजवणारे, मातीशी ज्यांचं नातं जोडले आहे अशा गोरगरिबांचे कैवारी, बहुजन समाजासाठी आरक्षणाचे प्रणेते असणारे लोकराजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगता निमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून संपूर्ण राज्यात साजरे केले जात आहे. 
     लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये शाहू महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यालयाचे प्राचार्य भिमराव आवारे सर व शिक्षक वृंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
       अमर निलाखे सर यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा, कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना दिला.
close