अण्णासाहेब धोत्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या कार्यकारणी निवडीसाठी जेजुरी येथे आढावा बैठक संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या कार्यकारणी निवडी संदर्भात
पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांनी दि. ३० मे २०२३ रोजी पुरंदर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे- पाटील व त्यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती सेल च्या पुरंदर ग्रामीण तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष , जेजुरी शहर अध्यक्ष कार्याध्यक्ष , सासवड शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष व महिला अध्यक्ष ,कार्याध्यक्ष यांच्या निवडी संदर्भात आढावा बैठक जेजुरी येथे घेण्यात आली.

