shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून केज मतदारसंघाच्या वैभवात पडणार भर मांजरा प्रकल्पवार पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या पर्यटन विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना!!

 
=============================
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-                     केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर पर्यटन विकास होणे गरजेचे असून त्या संबंधी आ.नमिता मुंदडा यांनी एमटीडीसी कडे पत्रव्यवहार करत केलेल्या मागणीची पर्यटन विभागाकडून दखल घेण्यात आली असून यासंबंधीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.  
 
बीड, लातूर व धाराशिव या    तीन जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार होणे हि गरजेची बाब लक्षात घेऊन आ. नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे तीन वर्षांपासून पाठपुरावा व  पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत महामंडळाने धनेगाव प्रकल्पावर जागतिक दर्जाचे जलपर्यटन होण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण आराखडा तयार करण्याच्या सूचना एमटीडीसी चे वरिष्ठ व्यवस्थापक यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी बीड यांना दिल्या आहेत व या आशयाचे  पत्र आ नमिता मुंदडा यांना नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे . 
=============================
 दरम्यान प्रल्पालगतच मुकुंदराज उद्यानाची तब्ब्ल 32 हेक्टर एवढी जागा अद्यापपर्यंत विकसित झाली न्हवती .आता जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ होण्याच्या शक्यतेने याच्या विकासाचाही मार्ग यामुळे मोकळा होईल . 
============================

मागील तीन वर्षांपासून आपण यासंबंधी सतत पाठपुरावा करत होते त्याची पर्यटन विभागाने दखल घेणे हा पहिला टप्पा आहे याला मूर्त स्वरूप येण्यास थोडा वेळ लागेल परंतु सुरुवात होणे देखील महत्वाचे आहे
                       - आ नमिता मुंदडा
close