शिर्डी प्रतिनिधी : ,( संजय महाजन )
सामाजिक बातमी
झाडांना मानवी आयुष्यात खूप महत्त्व आहे.मानवी जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे.
झाडे या निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे.निसर्गाचे ऋतुचक्र झाडांमुळे संतुलित राहते. झाडे व वनस्पतींपासून आपणास फळे आणि भाज्या मिळतात. त्यांच्यापासून आपणास फुले मिळतात.फळे मिळतात. झाडे सावली देतात. शुद्ध ऑक्सिजन देतात. झाडांपासून औषध तयार करतात वह्या पुस्तके तयार करतात.काही स्वार्थी शेतकरी व वृक्ष तोडणारे व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून मानवी जीवनाला धोका पोहोचवला आहे.
उष्माघातामुळे अनेक लोक मरत आहेत. उन्हाळ्यात गारपीटी सह पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड नुकसान होत आहे. पूर्वी झाडांमुळे १८ते २६ से. तापमान होते. झाडे तोडल्यामुळे ३६ते ५० से. तापमान झाले. मागील प्रत्येक १० वर्षापूर्वी ३५ते ४० अंश से असलेले तापमान होते. आज ४५से पार केले आहे. पुढील प्रत्येक ५ वर्षात ४५ते ५० नंतर ६० अंश से. पर्यंत जाईल तेव्हा अशी रडायची वेळ की ती झाडे सुकतील आपला जिल्हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून येत्या पावसाळ्यात प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येक व्यक्तीने किमान १० झाडे लावा व पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचे संगोपन करा.

