shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत छत्रपती शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा.

भिमाई आश्रमशाळेत छत्रपती शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा.

 ॲड. राहुल मखरेंच्या हस्ते लोकराजा शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन 
इंदापूर प्रतिनिधी:-  ( ६ मे २०२३) 
येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे, मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिना निमित्त स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव व संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरेंच्या हस्ते तथागत बुद्धांच्या मूर्तीस पुष्प, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या (तात्या)  प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा शैक्षणिक वर्ष सन २०२२- २३ चा  निकाल जाहीर करुन विद्यार्थी / पालकांना प्रगतीपत्रक व  गुणपत्रकाचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे तसेच सर्व प्राध्यापक,अधीक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.तर आभार हिरालाल चंदनशिवे यांनी मानले.
close