कौठळी शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ६ मे २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात आला.प्रथम मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी सरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.नंतर भारत ननवरे सरांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली.विद्यार्थ्यांची भाषणे झाली.नंतर या शैक्षणिक वर्षाच्या निकालपत्रकांचे शाळेतील सर्व मुलांना वाटप करण्यात आले.निकाल पाहून सर्व मुले आनंदीत झाली.या कार्यक्रमाला शाळा व्य समितीचे अध्यक्ष साहेबराव पिसाळ,सदस्या सोनाली माने,रवींद्र माने,शिलावती गायकवाड, तुकाराम मारकड सह पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.आभार उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड-मिसाळ यांनी मानले.

