एन. ई .एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन. ई एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर येथे आज ०६ मे २०२३ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १०१वी स्मृतिदिन उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे ,संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, मुख्याध्यापक रणवरे चंद्रकांत गोपाळराव,पर्यवेक्षक खरात मधुकर शंकर तसेच जुनियर विभागाचे विभाग प्रमुख बोंद्रे चंद्रकांत बलभीम उपस्थित होते .उपस्थित अतिथींच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक मार्गदर्शक हणमंते वैभव नारायण तर विज्ञान विभागातील शिक्षिका सौ नगरे स्वाती अभिजीत यांनी महाराजांविषयी विद्यार्थ्यांसमोर विचार मंथन केले. छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनाचा वृत्तांत आपल्या विचारातून व्यक्त केला. विद्यालयाचे प्राचार्य रणवरे सर यांनी शाहू महाराजांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असे मत व्यक्त केले .नंतर संस्थेचे विद्यमान सचिव श्री धनंजय सूर्यकांत रणवरे यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सर्वांनी पुढे चालू ठेवावा असे सांगितले .अशा या थोर महापुरुषांच्या चरित्राचे आजच्या तरुणाईने वाचन करावे असे मत व्यक्त केले .तसेच विद्यार्थ्यांच्या वार्षिक गुणपत्रकांचे वाटप प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माध्यमिक विभागाचे शिक्षक श्री चव्हाण प्रमोद ज्ञानदेव यांनी केले ,तर कार्यक्रमाचे निवेदन मलगुंडे अजिनाथ दत्तात्रेय यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी केले.यावेळी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

