प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापतीच्या निवडी शुक्रवार दि १२ मे रोजी होणार आहेत . बाजार समिती अंकुश इंगळे यांच्या माध्यमातून रमेश आडसकर, नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या ताब्यात आली असून सभापती पदावर अंकुश इंगळे यांची निवड पक्की मानली जात असून फक्त उपसभापती पदावर कोणता चेहरा दिसणार याची चर्चा सुरू आहे .
बाजार समितीच्या निवडणुका दि. २८ एप्रिल रोजी पार पडल्या व २९ तारखेला शेतकरी विकास पॕनलचा दणदणीत विजय झाला. मुंदडा, आडसकर व अंकुश इंगळे यांच्या कमालिच्या रणनितीमुळे निवडणूक जिंकली .परंतु आता प्रश्न पडलाय सगळ्या तालुक्याला की उपसभापती होणार कोण ?
यामधे सर्व संमतीने नाव येऊ शकते ते डॉ. वासुदेव नेहरकर यांचे कारण भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता व विश्वासार्हता १००% जपणारा म्हणून डॉ. वासुदेव नेहरकर यांचे नाव सगळ्यात आघाडीवर आहे . मुंदडा समर्थक नेताजी शिंदे यांचे नाव येऊ शकते परंतु समीकरण जुळवाजुळवी व राजकीय गणीताचा विचार केला तर डॉ वासुदेव नेहरकर यांचेच पारडे जड वाटते असे दिसून येत आहे .
याशिवाय तिसरे नाव वसंत केदार यांचे येण्याची शक्यता कमी असली तरी राजकारण शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निश्चित नसते.



