आम आदमी पार्टी ची स्वराज यात्रा २९ मे रोजी इंदापुरात..
इंदापूर प्रतिनिधी: आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा भक्तीचे उगम स्थान श्री क्षेत्र पंढरपूर ते किल्ले रायगड स्वराज्य यात्रा सोमवार २९ मे रोजी इंदापुरात असणार आहे. ही यात्रा इंदापूर शहरातून जाणार असून नगरपरिषद प्रांगणात जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर सदर यात्रा निमगाव केतकी, जंक्शन, डाळज मार्गे भिगवण ला जाईल व भिगवण पेठेतून पदयात्रा होईल अशी माहिती तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी दिली.
आम आदमी पार्टी जनसामान्यांपर्यंत पोचवणे, लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडणे, सत्तेतील वतनदार यांना हटवून सर्व सामान्य साठी काम करणारे सर्वसामान्यांचे राज्य आणणे हा संकल्प घेऊन ही यात्रा निघाली आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून आपचे कार्यकर्ते सहभागी राहणार आहेत. इंदापूर तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे अहवान आम आदमी पार्टी चे तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्या वतीने करण्यात आले.

