shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंतरराष्ट्रीय हयुमन राईट मानवधिकार संघटनेच्या सोलापुर जिल्हाध्यक्षपदी दिनेश मडके यांची निवड



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि.२७/ सत्य प्रामणिकेच्या जोरावर जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा मानुन काम केल्याने पत्रकार दिनेश‌ मडके यांना आंतरराष्ट्रीय हयुमन राईट ॲन्ड जसटिस आर्गनायझेशन या मानवधिकार संघटनेच्या  सोलापुर जिल्हाअध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली असुन‌ सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी कार्यरत राहतील असे मत सामाजिक कार्यकर्त प्रतिष्ठित व्यापारी राजुकाका शियाळ यांनी व्यक्त केले.

 आतंराष्ट्रीय मानवधिकार संघटनेच्या सोलापुर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल‌ पत्रकार दिनेश मडके यांचा सत्कार राजुकाका शियाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे अध्यक्ष नानासाहेब मोरे यांच्या हस्ते  फेटा बांधुन व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग यामध्ये तो श्रध्दा सबुरीधे काम करतो तो नक्कीच यशस्वी होऊन समाजाच्या हितासाठी कल्याणासाठी कार्यरत राहतो दिनेश मडके यांची निवड म्हणजे आपल्या तालुक्याचा बहुमान असुन त्यांच्या कार्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना दिनेश मडके म्हणाले कि आजपर्यत निरपेक्ष भावनेने काम केले  प्रामाणिकपणे काम केल्यास नक्की परमेश्वर आपणास  योग्यवेळी आपणास संधी देऊन काम करुन घेते मिळालेली संधी व पदाच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
close