अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
आजी, माजी सैनिकांचे विविध प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी १० मे २०२३ रोजी कोपरगांव तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अशी माहिती अहमदनगर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर (निवृत्त) विद्यासागर कोरडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोपरगांव तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पातळीवरील समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या आजी, माजी सैनिकांचे जमिनीचे अतिक्रमण, निवृत्तीवेतनाबाबत. कुटुंबियांवरील अन्यायाबाबत काही प्रश्न,अडीअडचणी असतील त्यांनी बैठकीस उपस्थित रहावे. आपले तक्रार अर्ज लेखी स्वरुपात दोन प्रतीत सादर करावेत, असे आवाहनही श्री.कोरडे यांनी केले आहे.
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

