एन. ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर इयत्ता दहावीचा निकाल ९८.७३ टक्के.
इंदापूर प्रतिनिधी: एन. ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर, तालुका इंदापूर जिल्हा पुणे, इयत्ता दहावीचा निकाल ९८.७३ टक्के लागला. अभिषेक अनिल रुपनवर याने 90 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर साहिल दादा शेंडे याने 89. 60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर कुमारी सानिका शिवाजी मोहिते व कुमारी ऋतुजा विलास मदने या दोघींनीही 87. 20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सूर्यकांत रणवरे, संस्था उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यशवंत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श नंदकुमार सूर्यकांत रणवरे विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे, पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बलभीम बोंद्रे या सर्व पदाधिकाऱ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल सर्व विद्यार्थी ,पालक व शिक्षक बंधू भगिनीचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

