निर्वांगीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयाचा मार्च २०२३ चा निकाल १००%.
इंदापूर प्रतिनिधी:
दिनांक २ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यात
निर्वांगीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयाचा मार्च २०२३ चा निकाल १००% लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक आलेले तीन विध्यार्थी खालीलप्रमाणे आहेत.
1) मंगेश दिलीप वीरकर 93.60%
2)कुमारी सिद्धी मोहनजी रोकडे 93%
3)कुमारी पायल भारत जाधव 91%
या प्रमाणे शेकडा गुण प्राप्त करून यश संपादन केले.
या वेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे संस्थेचे अध्यक्ष श हणमंत संपतराव पोळ व उपाध्यक्ष विठ्ठल भुजाबा पवार सचिव पांडुरंग भानुदास पाटील. व मुख्याध्यपक कल्याण हरिदास शिरसट यांनी अभिनंदन केले.

