*१. "अरे.. तुम्ही एवढी वर्षे काम करता, पण तुमच्या सोबत किती लोक आहेत?"
*विश्लेषण-
एखाद्याने क्रिकेटचे सामने भरवले, तर त्याच्या सोबत हजारो तरुण जमा होतात. याउलट एखाद्याने 'क्रिकेटमुळे तुमच्या करिअरची वाट लागते, क्रिकेटमुळे तुम्ही स्वत:चा आणि येणार्या पिढ्यांचा र्हास करताय, त्यामुळे अतिक्रिकेट बंद झालं पाहिजे' असं सांगितलं तर त्याच्याबरोबर साहजिकचं कोणीही येत नाही.
परंतु याचा अर्थ असा नाही, की 'तो क्रिकेटचे सामने भरवणारा' गर्दी जमा करतो, म्हणून यशस्वी आहे आणि 'क्रिकेट बंद करा' म्हणणार्याच्या सोबत कोणीही येत नाही, म्हणून तो चुकीचा आहे. प्रवाहाच्या विरोधात जाणार्यांच्या सोबत कोण येणार? मात्र.. हे ही तेवढचं खरं आहे, की प्रवाहाच्या विरोधात जीवंत मासे पोहतात, तर मेलेले मासे किंवा दुबळे मासे प्रवाहा बरोबर वाहतात.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुलेंचा त्यावेळी वार्षिक टर्नओव्हर २१ हजार होता, त्याच वेळी टाटांचा टर्नओव्हर २० हजार होता. त्या म. जोतीरावानी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज परिवर्तनाचं काम केलं. तेव्हा त्यांना स्वत:च्या वडिलांनी घराबाहेर काढले. चुलत भावाने फुलेंची यथेच्छ बदनामी करायला सुरुवात केली. शेवटी त्यांचे वंशज मृत झाल्यावर तीला म्युनिसीपाल्टीने बेवारस म्हणून ताब्यात घेतलं. परंतु याचा अर्थ असा नाही, की म. फुले करीत असलेले काम अयोग्य होतं. त्यांच्या वंशजाला समाजाने जरी बेवारस केलं, तरी म. फुलेंचे लाखो वैचारिक वारस निर्माण झाले. हे कोणीही मान्य करील. परिवर्तनाचे रिटर्न्स दृष्य स्वरुपात बघायला मिळत नसतात,तर एका पिढीची गुंतवणूक ही दुसर्या पिढीला भांडवल म्हणून उपयोगी ठरते.
श्रीकांत मुद्दे, लातूर

