shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी- पानमळा रस्त्यालगत अनोळखी महीलेची हत्या ? ; शिर्डीत खळबळ


राजेंद्र बनकर- शिर्डी
शिर्डी शहरातील शिर्डी - पानमळा रस्त्यालगत असलेल्या चिकूच्या बागेत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेचा गळा दाबून नंतर डोक्यात दगड टाकून निर्घूण हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. 

डोक्यावर दगड , पायात चप्पल , केसरी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेल्या अवस्थेत अंदाजे तीस वयातील ही महिला असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना समजताच उपविभागीय पो.अधि. संजय सातव , श्रीरामपुर उपविभागीय पो.अधि. संदिप मिटके , शिर्डी पो.स्टे.चे पो.नि. नंदकुमार दुधाळ व शिर्डी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पोलिसांनी पंचनामा करत संपूर्ण बागेत फिरुन पाहणी केली तर या महिलेची ओळख पटवण्यासाठी साधारणतः दोन तास विविध व्यक्तींना बोलावून चौकशी करण्यात आली माञ या महिलेची ओळख पटली नसल्याने हा मृतदेह कोणाचा व अशी निर्घूण हत्या करणारा कोण याचा शोध पोलिस घेत आहे. ही घटना समजताच शिर्डीतील पानमळा परिसरासह शिर्डी शहरातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते. तर या घटनेने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन या निर्घूण पणे हत्या कशामुळे व कोणी केली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असुन या घटनेचा तपास पोलीस करत आहे.


*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर


close