shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय लहुजी सेनेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

श्रीरामपूर शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दोन महिन्यांत पुतळा बसवावा- अन्यथा भारतीय लहुजी सेना उग्र आंदोलन छेडणार : हानिफभाई पठाण

श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील मेनरोड वर भारतीय लहुजी सेनेच्या वतीने लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता, सदर उत्सवानिमित्त आलेल्या भाविकांना प्रसाद स्वरूप वडापाव या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे प्रतिमा पूजन श्रीरामपूर तलाठी कार्यालयाचे विद्यमान तलाठी तथा तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र घोरपडे भाऊसाहेब यांचे हस्ते करण्यात आले.तर महाप्रसादाचे वाटप संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण,ॲड. रमेश कोळेकर यांचे हस्ते करण्यात आले.प्रतिमा चे पूजन करण्याकरिता लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, सचिनभाऊ गुजर, करणदादा ससाणे, चंद्रकांत क्षीरसागर आदी प्रमुख पाहुणे यांनी जयंती उत्सवात सहभाग नोंदवला.


यावेळी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय महासचिव हानिफभाई पठाण म्हणाले की,श्रीरामपूर शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दोन महिन्यांत पुतळा बसवावा, अन्यथा भारतीय लहुजी सेना उग्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रसंगी अतिथी म्हणून बाळासाहेब मोरे, संदिप शेठ शेडगे,राज शेडगे,विशाल मोजे, दीपक कुऱ्हाडे,सलमान पठाण, सतीश लोखंडे,रमिज पोपटीया, अब्दुल भाई शेख, रज्जाकभाई शेख, फैजान पठाण, यश कोळेकर शुभम बागुल, हारूनभाई तांबोळी, राजेन्द्र त्रिभुवन,सागर चापानेरकर,रईस शेख,डॉक्टर जमदाडे,साबीर शाह, सचिन घुगे, नागेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर
close