शंभू महादेव विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के .
इंदापूर प्रतिनिधी: आज दोन जून 2023 रोजी इयत्ता दहावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून दगडवाडी येथील शंभू महादेव विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. या विद्यालयातील
1) प्रथम क्र .सागर शिवाजी शिंदे ९५.२०%,
2) द्वितीय क्र .शुभम दत्तात्रय तांबवे ९१.८०%,
3) तृतीय क्र. हर्षदा शरद रासकर ९१.६०%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष वसंत मोहोळकर तसेच संस्थेचे सचिव चंद्रकांत सोळशे सर तसेच शाळा स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामदास रासकर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदट आशा वसंत मॅडम आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
एकूण विद्यार्धी ४९ बसले होते त्यापैकी ४९ विद्यार्धी पास झाले शाळेचा निकाल १००% लागला आहे. ९०% च्या पुढे ८ विद्यार्थी ८० % च्या पुढे २७ विद्यार्थी आहेत ७० % च्या पुढे १४ विद्यार्थी आहेत.

