shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे चोर गाडीसह जेरबंद


प्रतिनिधी : राम चव्हाण

नगर : 21 /  ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे दोन चोरटे त्यांच्याकडे असणाऱ्या होंडा कंपनीच्या काळ्या रंगाच्या शाईन गाडीसह जेरबंद करण्यात आले .

शनिवार दि . 17/06/2023 रोजी  अहमदनगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील दशमी गव्हाण तालुका अहमदनगर जिल्हा अहमदनगर गावात रात्री 8:30  वाजता श्री नवनाथ काळे यांच्या घरी दोन चोर आलेले आहेत आणि चोरीचा प्रयत्न करत आहेत याची माहिती मिळताच गावचे उपसरपंच श्री उद्धव कांबळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती सर्व गावाला व पोलीस स्टेशनला कळवली .
त्यामुळे तात्काळ गावकरी व अहमदनगर तालुका पोलीस  स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिशिर कुमार देशमुख यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशनची नाईट राऊंडची गाडी घटनास्थळी दाखल झाले.चोरांचा पाठलाग सुरू झाला.गावकरी आणि  पोलीस यांनी पाठलाग करून 2 चोर त्यांच्याकडे असणाऱ्या होंडा कंपनीच्या काळ्या रंगाच्या शाईन गाडीसह पकडले. पकडल्यानंतर चोरांकडे बॅगमध्ये काळया रंगाचे कपडे,शाम्पूच्या पुड्या,तेलाच्या पुड्या,दगड,गलूर असे सर्व साहित्य आढळून आहे. 

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या होंडा कंपनीच्या काळ्या रंगाच्या शाईन गाडीसह दोन चोर  जेरबंद करण्यात दशमी गव्हाण ग्रामस्थ व अहमदनगर तालुका पोलिसांना यश आले.
close