रामवाडी येथे संत श्री योगीराज चंगावटेश्वर पालखीतील वारकऱ्यांना फडतरे कुटुंबीयांच्या वतीने चहापाणी व चिवडा वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी रामवाडी येथील आध्यात्मिक वारसा असणारे फडतरे कुटुंबाच्या वतीने दिनांक २४ जून २०२३ रोजी संत श्री योगीराज चंगावटेश्वर पालखीचे फडतरे यांच्या पती-पत्नीच्या हस्ते पूजन करण्यात आले.
सोहळ्यातील वारकऱ्यांना हरिभाऊ फडतरे व शिवतेज फडतरे यांच्या वस्तीवर गेली ४० वर्षे भारुडाचे कार्यक्रमानंतर फडतरे यांच्या वतीने चहापाणी व चिवडा वाटप करण्यात आला. भारुडाचे कार्यक्रम झाल्यावर पालखी पुढील मुक्कामासाठी रवाना झाली.

