shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कालठण नं. १ जि. प. प्राथमीक शाळेत मुलांनी अनुभवला पालखी सोहळा..*

*कालठण नं. १ शाळेत मुलांनी अनुभवला पालखी सोहळा..*

*चिमुकल्या विठ्ठल रुक्मिणीचे जागोजागी मनोभावे पुजन..*

*शालेय शिक्षण समितीच्या वतीने मुलांना जेवण.
इंदापूर प्रतिनिधी: दि २४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालठण नं. १  व अंगणवाडी यांचे संयुक्तपणे कालठण नं. १  परिसरात पालखी , दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी , पताका , तुळस घेतलेल्या मुली , टाळ , कपाळी गंध , ग्यानबा तुकाराम जयघोष करत सुंदर साड्या घालून मुली सहभागी झाल्या. मुलांनी कुर्ता पायजमा टोपी पेहराव केला होता. जेष्ठ नागरिक पालखी कौतुक केले.
         जागोजागी महिलांनी चिमुकल्या विठ्ठल रुक्मिणी पुजन केले.  शालेय शिक्षण समितीच्या वतीने मुलांना जेवण देण्यात आले.पालखी सोहळ्यात पालक व महिला सहभागी झाल्या. नियोजन मुख्याध्यापक राजेंद्र जगताप गुरुजी, घुले गुरुजी, बोराटे गुरुजी ,राऊत मॅडम व अंगणवाडी सेविका शिंदे मॅडम ,सपकाळ मॅडम  यांनी केले.
यावेळी अण्णासाहेब धोत्रे ,संतोष सपकळ ,बबन चोरगे, महादेव भोई ,संजय सपकळ ,समाधान शिंदे, लक्ष्मण मळगे, नागनाथ गायकवाड, युवक नेते हनुमंत पाटील ,दादा क्षीरसागर, प्रसाद पाटील,दत्तात्रय मळगे लक्ष्मण, विजय पाडूळे,इंन्नुस मुलानी, तात्याराम चोरगे,व महिला मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जगताप गुरुजी, घुले गुरुजी, बोराटे गुरुजी, राऊत मॅडम, व सर्व कालठन ग्रामस्थ उपस्थित होते.
close