shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तनिष्का लहानु वाडेकर हीचा सन्मान सोहळा संपन्न ...



तनिष्काचे एस एस सी परिक्षेत यश

प्रतिनिधी : आसावरी वायकर

 चिचोंडी पाटील : ५ /  श्री लहानु महादेव वाडेकर यांची कन्या कु.तनिष्का लहानू वाडेकर हिने एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटील महाविद्यालयामध्ये ( ८९ .६०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा सन्मान सोहळा करण्यात आला .

यावेळी मार्केट कमिटीचे मा. संचालक श्री बाजीराव (अण्णा) हजारे,  नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री अशोक (बापू) कोकाटे, युवा सेना तालुका अध्यक्ष श्री सचिन (काका) ठोंबरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री अमित बोरा, जगदंबा माता ट्रस्टचे सचिव श्री संतोष वाडेकर, श्री आनंदराव मुटकुळे (चेअरमन), श्री लक्ष्मण खेडकर, कामधेनु पतसंस्थेचे सहसचिव श्री अंबादास कोकाटे, श्री दत्तात्रय धलपे, श्री बाळासाहेब कोकाटे, श्री शामभाऊ कोकाटे, श्री सतीश कोकाटे, श्री मनोज गाडेकर आदी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते.

कु. तनिष्का हिला पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्वांनी मनःपूर्वक खूप खूप खूप शुभेच्छा दिल्या .
close