shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक योग दिना निमित्त हार्मनी इंटरनॅशनल स्कूलमधे विद्यार्थ्यांनी गिरवले योगाचे धडे

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर :  २१ /  वडगाव गुप्ता येथील नामांकित हार्मनी इंटरनॅशनल स्कूल येथे आज दिनांक २१ जून रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार तसेच विविध योग प्रकाराचा अभ्यास केला. या मुलांना अहमदनगर मल्लखांब व योगा सेंटरचे प्रशिक्षक श्री. चंद्रशेखर चावंडके व स्कूलचे क्रीडाशिक्षक श्री.अमोल ठोंबे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता करताना स्कूलचे प्राचार्य श्री.अशोक बेरड सर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व सांगितले व 'आरोग्यं धनसंपदा ' हा मंत्र दिला. तसेच शाळेच्या शिक्षिका डॉ. सुवर्णा पळसकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व योगाचे महत्त्व सांगितले.
close