shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

योगदिनानिमित्त लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयातील ५१० विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे प्रशिक्षण*

 *योगदिनानिमित्त लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयातील ५१० विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे प्रशिक्षण*
 
      इंदापूर प्रतिनिधी: सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगाभारात योगसाधनेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता *“आंतरराष्ट्रीय योग दिवस” औचित्याने जगभरात अधिकृत रित्या मान्यताप्राप्त झाला आहे. युगात उत्तम आरोग्यासाठी योगा प्राणायाम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे. यासाठी लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी मध्ये आंतरराष्ट्रीय योगगुरू श्री.ऋतेश कवळे सर यांनी विद्यार्थ्यांना योगासने प्राणायाम यांची प्रात्यक्षिक करून माहिती दिली.* यावेळी *विद्यालयाचे प्राचार्य श्री.भिमराव आवारे सर, शिक्षक वृंद उपस्थित होते.*
*"निरोगी शरीरात निरोगी मन वसते"*
    योगा केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी,शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी,स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी तसेच श्वसन, ऊर्जा ही आणि चैतन्य सुधारण्यासाठी योगा अत्यावश्यक आहे.
   *श्री.अमर निलाखे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले*.

close