निरोगी दिर्घायुष्यासाठी सर्वांनी योग करा - सोनाई समूहाचे अध्यक्ष दशरथ माने.
इंदापुर प्रतिनिधी: पतंजली योग समिती इंदापूर ही सामाजिक भावनेतून मोफत योगाचे धडे देणारी सामाजीक संघटना असून योगाची खूप मोठी चळवळ पतंजलीने उभी केली आहे. नियमित योगा केल्यामुळे व्यक्ती चारित्र्यवान ,निरोगी, दीर्घायुषी आणि कर्मनिष्ठ बनतो असे मत जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी सोनाई समूहाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी व्यक्त केले
पतंजली योग समिती आणि युवा भारत इंदापूर यांचे वतीने इंदापूर नगरपालिका जवळील शाळा नंबर एक व दोन येथे नवव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते
.याप्रसंगी दशरथ माने ,इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रकाश पाटील, सहन्यायाधीश के.सी. कलाल,सहन्यायाधीश एस. एस. साळुंखे मॅडम ,मारुती मारकड, शिवाजी अवचार, महादेव सोमवंशी,जयंत नायकुडे, गोपीचंद गलांडे, उमा इंगोले यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी मुख्य न्यायाधीश पी एल पाटील यांनी पतंजली योग समितीच्या कार्याचे कौतुक करत कार्यास शुभेच्छा दिल्या.
युवा भारत च्या वतीने प्रशांत गिड्डे ,सचिन पवार, रामेश्वरजी साठे, भालचंद्र भोसले, अण्णासाहेब चोपडे यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
भारत स्वाभिमान चे प्रभारी जयकुमार शिंदे,बिभिषन खबाले पतंजलीचे अध्यक्ष मल्हारी घाडगे ,चंद्रकांत देवकर, राजेंद्र चव्हाण ,भिमराव वणवे यांनी उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत देवकर ,सुनील कांबळे राजेंद्र चव्हाण, किसन पवार ,काशिनाथ पारेकर, हमीद आतार, देवराव मते, मंगेश घाडगे ,समाधान भोरकडे, बाजीराव शिंदे, विकास खिलारे, रविंद्र ननवरे,डाॅ विक्रम पोतदार ,सायरा आतार,जयश्री खबाले, रेखा भंडारी, रेश्मा निलाखे, यांनी प्रयत्न केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र परबत यांनी तर आभार प्रदर्शन शरद झोळ यांनी केले.

