बांडेवाडी शाळेत योग दिनानिमित्त योगासने , प्राणायाम प्रात्यक्षिके.*
मुले , पालक , शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.*
अंगणवाडीतील मुलांनी केले विविध योगासने.*
इंदापूर प्रतिनिधी: दि 21 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन विविध प्रकारचे योगासने , प्राणायाम , मुक्त हालचाली , प्रार्थना , ध्यान , मनोरंजन खेळ घेवून उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी योगासने , प्राणायाम महत्व सांगून प्रात्यक्षिके घेतली.
यावेळी ताडासन , वृक्षासन , त्रिकोणासन , अर्धचक्रासन , वज्रासन अशी विविध आसने मुलांनी उत्कृष्ट केली. त्याचबरोबर कपालभाती , अनुलोम विलोम , भ्रामरी , ध्यान प्राणायाम केले. यावेळी शिक्षिका ललिता वाघमोडे , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , मदतनीस उर्मिला बांडे पालक उपस्थित होते.

