shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री छत्रपती शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.डॉ. प्रकाश बुवाजी पांढरमिसे यांची निवड.

श्री छत्रपती शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.डॉ. प्रकाश बुवाजी पांढरमिसे यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे प्राचार्य पदाचा पदभार डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनीआज स्वीकारला.त्यावेळी ते म्हणाले,भवानीनगर सारख्या   ग्रामीण  भागातील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने श्री छत्रपतींच्या नावाने सुरु असलेले हे महाविद्यालय आहे.या महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा  वसा आणि वारसा घेऊन भवानीनगर सारख्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यावर भर दिला जाईल . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या या महाविद्यालयाचा शैक्षणिक दृष्ट्या गुणात्मक आलेख उंचावण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला जाईल.पदभार स्विकारल्या नंतर प्राचार्यांच्या  शुभहस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते.
     डॉ. प्रकाश पांढरमिसे यांचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रशांत दादा काटे व संस्थेच्या सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले.सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर यांनी केले तर आभार प्रा. धुळदेव वाघमोडे यांनी केले.
close