shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार आबा विठ्ठल रणवरे यांना देऊन केले सन्मानित.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार  आबा विठ्ठल रणवरे यांना देऊन केले सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाकर  गावचे सुपुत्र यांना यशवंत सेना अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष संवर्धन व संरक्षण आणि संगोपन या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत असल्याबद्दल पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२३ मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार  आबा विठ्ठल रणवरे यांना अहमदनगर येथील सावेडी येथील माऊली सभागृहात ( दि.१० जून )देऊन सन्मानित करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप, 
यशवंत सेनेचे शहर अध्यक्ष कांतीलाल जाडकर , प्रा. डॉ. लक्ष्मणराव मतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश थोरात ,जे असोसिएशनचे राज्याध्यक्ष विधी तज्ञ महेश शिंदे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर ,संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, लक्ष्मण मतकर रावसाहेब काळे, योगेश शेंडगे, राजेंद्र तागड, इंजिनियर डीआर शेंडगे, सौ शर्मिला नलावडे, ज्योती उनवणे, मच्छिंद्र बिडकर, डॉक्टर संतोष गिरे, विजय भालसिंग,  विधीतज्ञ सुनील महाराज तोडकर, अरुण वाघमोडे, अफसर शेख, अजय जाडकर, डॉ. धीरज ससाने, बाबासाहेब राशिनकर, विठ्ठल दातीर ,प्रमिला शेळके ,आदी मान्यवर उपस्थित होते.
close