राष्ट्रीय समाज पक्षाच्या इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची शासकीय समित्यावरती सदस्य पदी वर्णी.
इंदापूर तालुक्यातील रासपच्या कार्यकर्त्यांमध्ये झाले नवचैतन्य निर्माण .
इंदापूर प्रतिनिधी: तानाजी शिंगाडे यांना जिल्हा नियोजन मंडळात समाविष्ट करण्यात आल्यानंतर इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष तानाजी मारकड यांची नेहरू युवा केंद्र पुणे च्या सल्लागार सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली. यामुळे इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रीय समाज पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील कार्यकर्ते आपले पक्षासाठी योगदान देत असताना या निष्ठावंत कार्यकर्त्यांना माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय समितीवर काम करण्याचे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध होत आहे असे असताना सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर हे विस्थापित कार्यकर्त्यांना प्रस्थापित कार्यकर्त्यांच्या बरोबर नेऊन बसवत असल्यामुळे माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या विचारधारेला कार्यकर्ते प्रेरित होऊन राष्ट्रीय समाज पक्ष नक्कीच उभारी घेणार असे या दोन कार्यकर्त्यांच्या निवडी वरून दिसत आहे.
आज दिनांक ११ जून २०२३ रोजी इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष तानाजी मारकड यांची पुणे जिल्हा सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल 'राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तानाजी शिंगाडे, जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, उपाध्यक्ष सतिशराव शिंगाडे, प्रवक्ते, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, कार्याध्यक्ष नवनाथ कोळेकर, युवक अध्यक्ष आकाश पवार, सरचिटणीस अविनाश मोहिते, युवक उपाध्यक्ष सोन्या जानकर ,महेश पारेकर,सुरज सलगर,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

